डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा व्हाइट कोट समारंभ उत्साहात
जळगाव (प्रतिनिधी ) – व्याधीग्रस्त रूग्ण डॉक्टरांना देव मानून रूग्णालयात उपचारासाठी येत असतो. डॉक्टरांची नितीमत्ता आणि करूणा चांगली असेल तर जग जिंकता येते. डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफच्या कोटचा रंग पांढरा असतो. याचा थेट संबंध रुग्ण आणि त्यांच्या सुरक्षिततेशी आहे. हे वैद्यकीय व्यवसायाचं प्रतीक मानले जातं. असल्याचे प्रतिपादन गोदावरी फॉउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ.उल्हास पाटील यांनी आज केले.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या बायोकेमिस्ट्री विभागातर्फे एमबीबीएसच्या प्रथम वर्षात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा व्हाइट कोट व डीन अॅड्रेस समारंभ सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडला. डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून अशा प्रकारचा समारंभ घेतला जात आहे. याप्रसंगी ते बोलत होते. समारंभाच्या सुरूवातीला डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते आरोग्य देवता धन्वंतरीचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी गोदावरी फॉउंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील, हृदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील,अधिष्टाता डॉ. प्रशांत सोळंके, अॅनाटॉमी विभागाच्या प्रमुख डॉ. शुभांगी घुले वाघ,बायोकेमिस्ट्री विभागप्रमुख डॉ. निलीमा पाटील, डॉ. रणधिर कुमार पांडे,रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, डॉ. आलोक कुमार यादव, मायक्रोबायोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ.कैलास वाघ, डॉ. दिलीप ढेकळे, डॉ बापूराव बिटे, डॉ.राशिका सक्सेना, डॉ. योगेश तायडे, डॉ. प्रकाश तिरूवा, डॉ. आयुष महाजन, डॉ.चंद्रया कांते,डॉ. सी.डी सारंग,डॉ. अनंत बेंडाळे, डॉ. काशिनाथ महाजन, डॉ. विजय बाविस्कर, डॉ. दिपक अग्रवाल,डॉ. सत्यसाई पांडा,रेक्टर सुरेंद्र गावंडे इ मान्यवर उपस्थित होते. डॉ. उल्हास पाटील यांनी पुढे बोलतांना सांगितले की, डॉक्टरांच्या थेट संबंध रुग्णाच्या सुरक्षेसोबतही आहे. डॉक्टरांचं मूळ काम रुग्णावर उपचार करणे, हे असतं. डॉक्टर विविध रोगांची लागण झालेल्या रुग्णांना भेटून त्यांच्यावर उपचार करतात. जेव्हा तुम्ही समाजात डॉक्टर म्हणून कार्य करू लागतात तेव्हा तुमची जबाबदारी वाढते. तसेच तुम्ही ज्या संस्थेतून शिक्षण घेतले त्या संस्थेचे तुम्ही प्रतिनीधीत्व करीत असतात. त्यामुळे वैद्यकीय शैक्षणिक वर्षात अभ्यासासह अंतर्गत मुल्यांकन तुम्हाला गांभीर्याने घ्यावे लागणार आहे. आज तुम्हाला दिलेली नितीमत्ता आणि करूणेची शिकवण तुम्हाला तुमच्या जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे. या संस्थेत तुम्हाला खुप उज्ज्वल भविष्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
देवानंतर डॉक्टरांनाच मानाचे स्थान – अधिष्टाता डॉ.प्रशांत सोळंके
प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस हा त्यांच्या आयुष्यातील खुप मोठा दिवस आहे.गोदावरी संस्था ही बॅ्रंड असून हा वटवृक्ष तुम्हाला जग जिकंण्यासाठी प्रोत्साहीत करणार आहे. विद्यार्थ्यांनी घातलेला हा व्हाइट कोट दिसायला सुंदर आहे, पण त्याची जबाबदारी तितकीच कठीण आहे. खुप घाव सहन केल्यावर जशी सुबक मुर्ती घडते तसेच हे वैद्यकीय शिक्षण आहे. वाचाल तर जिंकाल, खुप घाव सहन करावे लागतात, परिश्रम करावे लागतात आणि मगच आपण यशाचा पल्ला गाठु शकतो. देवानंतर डॉक्टरांनाच समाजात मानाचे स्थान असल्याचे मत अधिष्टाता डॉ.प्रशांत सोळंके यांनी व्यक्त केले.
वैद्यकिय प्रवेश हेच मोठे व्यासपिठ- प्रमोद भिरूड
पालक व विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे नियम व अभ्यासक्रमाबददल जबाबदारीची जाणीव करून देतआपला एमबीबीएसचा प्रवेश निश्चीत झाल्यानंतर हेच मोठे व्यासपिठ असून येत्या ५ वर्षात जिवापाड मेहनत घेवून एक निष्णात तज्ञ म्हणून तुम्ही बाहेर पडावे अशी तुमच्या पालकांची इच्छा असते आणि त्यासाठी पालक खुप समर्पण करून हे स्वप्न रंगवत असल्याने त्यांच्या स्वप्नांना पुर्ण करणे ही तुमची जबाबदारी असल्याचे मत वैद्यकीय महाविद्यालयाचे रजीस्ट्रार प्रमोद भिरूड यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना व्हाइट कोट घालून गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या वतीने चिन्मया वझे, पियुष बिसेन यांनी मनोगत व्यक्त केले. तर समारंभाचे सुत्रसंचालन सुयश देशपांडे, मृण्मयी टीबे, साहील जोशी, मानसी राणे,यांनी केले ंतर आभार साहील आणि मानसी यांनी मानले. याप्रसंगी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टर्स उपस्थीत होते.









