नागपूर ( वृत्तसंस्था )– नागपूरमध्ये ‘नीट’ परिक्षेचा महाघोटाळा समोर आला आहे. 50 लाखांच्या मोबदल्यात मेडिकल अभ्यासक्रमांना प्रवेश देण्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं. आर के एज्युकेशनच्या परिमल कोतपल्लीवार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरातील आणखी काही कोचिंग क्लासेस सीबीआयच्या रडारवर असल्याची माहिती आहे.
नीट परीक्षा 12 सप्टेंबरला देशभरातील 202 शहरातील केंद्रावर पार पडली. सीबीआयनं गेल्या आठवड्यात नागपूरमध्ये छापे टाकले होते. त्यावेळी नागपुरातील पाच विद्यार्थ्यांना सीबीआयने अटक केली होती.
आर के एज्युकेशनच्या परिमल कोतपल्लीवार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूरमधील आणखी काही कोचिंग क्लासेस सीबीआयच्या रडारवर असल्याची माहिती आहे.
मेडीकल कॅालेजमध्ये ॲडमिशन मिळवून देण्यासाठी नीट परिक्षेत बोगस विद्यार्थी बसवल्याचं उघड झालं होतं. दिल्लीतील सीबीआयच्या टीमने नागपूरातील कोचिंग क्लासेसवर छापा टाकला होता. नागपूरमधील आणखी कोचिंग क्लासेस देखील सीबीआयच्या रडारवर असल्याची माहिती आहे. यामुळे नागपूरमधील कोचिंग क्लासेसचे धाबे दणाणले आहेत.
सीबीआयनं सक्करदरा परिसरातील कोचिंग क्लासेसच्या संचालकांनाही अटक केल्याची माहिती आहे. 12 सप्टेंबरला झालेल्या नीट परिक्षेत बोगस विद्यार्थी बसवल्याप्रकरणी अटक झाली असल्याचं कळतंय. सीबीआयनं धाडीत काही कागदपत्र जप्त केल्याची माहिती आहे. नागपूरातील पाच मोठ्या कोचिंग क्लासेसवर सीबीआयच्या धाडी पडल्या होत्या. नागपुरातील गणेशनगर, नंदनवन, आझमशाहा चौकातील क्लासेसवर छापे टाकण्यात आले होते. ही कारवाई पुढं देखील सुरु राहण्याची शक्यता आहे.
परीक्षा सुरु असतानाच प्रश्नपत्रिका लीक झाली होती. जयपूर पोलिसांनी 8 जणांना अटक केली आहे. परीक्षार्थीसह पोलिसांनी तिच्या कुटंबातील सदस्य, परीक्षा केंद्र सुपरवायझर आणि इतरांना अटक केली होती. जयपूर पोलिसांनी प्रश्नपत्रिका लीक प्रकरणाची डील 30 लाखांना ठरल्याची माहिती दिली होती.







