• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

संस्था हडप केल्याच्या खटल्यात पालकमंत्री गुलाबराव, पुत्र प्रतापराव यांच्यासह सहा जणांची निर्दोष मुक्तता

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 17, 2023
in Uncategorized
0

म्हसावद येथील पद्मालय शिक्षण प्रसारक मंडळ प्रकरण

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील म्हसावद येथील पद्मालय
शिक्षण प्रसारक मंडळ संस्था हडप केल्याच्या प्रकरणांमध्ये सात वर्षांपूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्याचा खटला न्यायालयात सुरू होता. आज शुक्रवार १७ फेब्रुवारीला खटल्याचा निकाल लागून न्यायालयाने पालकमंत्री गुलाबराव पाटील, त्यांचे पुत्र प्रतापराव पाटील यांच्यासह सहा जणांची निर्दोष मुक्तता केली आहे.

म्हसावद येथिल पद्मालय शिक्षण प्रसारक मंडळ संस्था ही २८ सप्टेंबर १९९१ ला स्थापन झाली. संस्थेला अडचणी आल्यामुळे संस्थेतील काही सभासदांनी तत्कालीन आमदार गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन संस्था २००८ साली त्यांच्या ताब्यात दिली होती. त्यानंतर काही मंडळींना सचिव पदावरून हटवण्यात आले. या व्यक्तींनी संस्था हडप केल्याचा गुलाबराव पाटील यांच्यावर आरोप केला. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला गुन्हा देखील दाखल केला. या गुन्ह्यामध्ये गुलाबराव पाटील यांना अटक देखील झाली होती.

त्यानंतर या खटल्याचे कामकाज न्यायालयात सुरू होते. न्यायाधीशांनी सर्व बाजूने युक्तिवाद ऐकल्यानंतर व परिस्थिती जाणून घेतल्यावर आज शुक्रवारी निकाल दिला. ह्या निकालात पालकमंत्री गुलाबराव रघुनाथ पाटील, यांच्यासह त्यांचे पुत्र प्रतापराव गुलाबराव पाटील, बंधू सुनील रघुनाथ पाटील, रामसिंग अमृत पाटील, सुगनचंद फकीरचंद पाटील, डॉ. कैलास लक्ष्मण पाटील यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

या खटल्यामध्ये एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले. अभियोग पक्षाने सदरच्या गुन्ह्यातील केलेले आरोप शंकेच्या पलीकडे शाबित न करू शकल्यामुळे सदरच्या गुन्ह्यातून न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. खटल्यामध्ये संशयित आरोपींतर्फे अँड. प्रदीप देशमुख व ॲडव्होकेट रवींद्रसिंग पाटील यांनी तर फिर्यादीतर्फे अँड. गोपाळ जळमकर यांनी कामकाज पाहिले.


 

 

Tags: #nirdosh #gulabrao #patil #gulabraopatil
Previous Post

हळद पिकातून मिळेल आर्थिक समृद्धीचा मार्ग – डॉ. निर्मल बाबू

Next Post

जळगावात सलग दुसऱ्या दिवशी खळबळ ; कोर्टात एकाकडे आढळला चॉपर ; एलसीबीची धडक कारवाई

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावात सलग दुसऱ्या दिवशी खळबळ ; कोर्टात एकाकडे आढळला चॉपर ; एलसीबीची धडक कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon