मुक्ताईनगर प्रतिनिधी;- तालुक्यातील निमखेडी बु ॥ येथील शेतकऱ्याची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गजानन श्रीराम मुंडे (वय-३७) रा. निमखेडी बु ॥ ता. मुक्ताईनगर हे शेतीकरतात. कामासाठी त्यांच्याकडे (एमएच १९ डीजी ५२८८) क्रमांकाची दुचाकी आहे. २४ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता त्यांनी दुचाकी घरासमोर लावली होती. २५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री २ वाजता दुचाकी जागेवर दिसून आली नाही. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संदीप खंडारे करीत आहे.







