अनिष्ट रूढी परंपरांना फाटा
रावेर ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथील केळी व्यापारी अमजद बाबू खान यांच्या दोन मुलींचा साखरपुडा दि. २० सोमवार रोजी सकाळी दहा वाजता आयोजित होता. साखरपुडा आयोजित कार्यक्रमात समाजातील काही प्रतिष्ठित लोकांनी व नातेवाईकांनी यावेळी अनिष्ट रूढी व परंपरांना फाटा देऊन निकाह करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.
यावेळी लागलीच मशिदीचे मौलवी मोहम्मद सादिक यांना बोलविण्यात आले. विवाहाचे सर्व सोपस्कार पूर्ण केले व साखरपुड्यात लग्न लावून समाजापुढे एक चांगला आदर्श निर्माण केला.असा निर्णय घेण्याचा सर्व स्तरातील समाज बांधवांनी पुढाकार घेण्याची गरज आजच्या काळात आहे. योग्य वेळी दोन्ही मुली अलफीया खान वर जसीब शेख, विवरा व दुसरी मुलगी अरशिया वर फैसल खान, यांचा विवाह संपन्न झाला. यावेळी नवरदेवाचे वडील अफसर शेख दिलावर विवरा व गावातीलच अफजल खान यांना सर्व नातेवाईक आप्तसकीय मित्रमंडळी यांनी अभिनंदन केले व त्यांच्या निर्णयाचे कौतुकही केले.
या साखरपुड्याला सावदा येथील राष्ट्रवादीचे राजेश वानखेडे, फैजपूरचे माजी नगराध्यक्ष कुर्बान शेख, तसेच, हमीद शेख, फारुख शेख, भूपेंद्र सोनवणे, मोहम्मद पिंजारी, कैलास बालानी, सुनील माखीजा, आशिष कापडे, पवन परदेशी, मुक्तवली शरीफ खान, ग्रामपंचायत सदस्य, दिलशाद शेख, दस्तगीर खाटीक, गावातील इतर प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.