मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर रामकरण यादव यांची घेतली भेट
चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) :- मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर रामकरण यादव (मुंबई) यांना निंभोरा स्टेशन येथे सर्वपक्षीय कार्यकर्ते, शेतकरी बांधव, गावकऱ्याच्या वतीने निंभोरा व सावदा स्टेशन येथे बंद केळी वॅगन सुरू करणे व मुंबई सीएसटी अमृतसर एक्सप्रेसला अप-डाऊन गाडीला थांबा मिळण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले.
भुसावळ ते खंडवा सेक्शनदरम्यान वार्षिक तपासणीनिमित्ताने निभोरा स्टेशन येथे आले असताना निंभोरा, दसनूर, सिंगनूर, बलवाडी, खिर्डी येथील सर्वपक्षीय कार्यकते व गावकऱ्याच्या वतीने अँटी करप्शन फौंडेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रा. संजय मोरे, किसान फुटसेल संस्था चेअरमन प्रल्हाद बोडे, नंदकिशोर चोपडे, विजय सोनार आदींनी जनरल मॅनेजर रामकरण यादव यांचा सत्कार केला.
गावकऱ्याच्या वतीने प्रा.संजय मोरे, स्वप्नील गिरडे, नंदकिशोर चोपडे यांनी निवेदन दिले. प्रा. संजय मोरे हे चार वर्षापासून केंद्र सरकारकडे सावदा निभोरा स्टेशन येथील बंद असलेली केळी वॅगन पुनश्च सुरू करण्यात यावी. मुंबई सीएसटी अमृतसर एक्सप्रेस, मुंबई गोरखपूर एक्सप्रेस गाडीला निंभोरा स्टेशनवर थांबा मिळावा. भुसावळ-कटनी मेमो गाडीची वेळ पूर्ववत करावी. निंभोरा खिर्डी परिसरातील शेतकऱ्याच्या केळी मालाला चागला भाव मिळावा व स्थानिक युवकांना रोजगार मिळावा यासाठी केद्रीय मंत्री नितीन गडकरी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाठपुरावा .करीत आहे. आज पुन्हा सर्व पक्षीय कार्यकर्ते शेतकरी बांधव यांच्यासमवेत सेंट्रल रेल्वे जनरल मॅनेजर श्ररामकरण यादव यांना विनंती करून निवेदन देण्यात आले.
चर्चाप्रसंगी डिगंबर चौधरी, नीलकठ पाटील, सुरेश भंगाळे, राजीव बोरसे, नंदकिशोर चोपडे, सुरेश चौधरी, योगेश कोळंबे, अनिल बऱ्हाटे, भास्कर महाले, सचिन महाले, सरपंच काशिनाथ सेलोडे, हेमंत पवार, विजय सोनार, मंगेश राठोड, भूषण चौधरी, हेमत मगर, उमेश पाटील, हेमंत पवार, संजय कोळी, गजानन महाजन, रवींद्र निंभोरे, परमानंद सेलोडे, भीमराव कोचुरे, श्रावण महाले, ललित कोळंबे, विशाल तायडे, माधव बऱ्हाटे, भगवान महाजन, प्रकाश चौधरी, संजय पाटील, राकेश सपकाळे, रेल्वेचे अधिकारी, रेल्वे पोलीस अधिकारी, स्थानिक पोलीस अधिकारी, कर्मचारी, शेतकरी बांधव, गावकरी उपस्थित होते. सेंट्रल रेल्वेचे जनरल मॅनेजर यांनी, प्रयत्न करतो, असे सांगितले. सूत्रसंचालन स्वप्नील गिरडे यांनी केले. आभार सुनील कोंडे यांनी मानले.