चंद्रपूर येथील अनियमितता प्रकरण भोवले
जळगाव (प्रतिनिधी) : माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्याविरोधात चंद्रपूर येथील लाभार्थ्यांनी केलेल्या तक्रारीची चौकशी विभागीय शिक्षण उपसंचालक, नागपूर यांनी केली असता, यामध्ये अनियमितता आढळून आली. पुढील आदेश होईपर्यत चव्हाण यांना निलंबित केल्याचे आदेश राज्याचे सहसचिव टि. वा. करपते यांनी काढले आहेत.
शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्याविरुद्ध दि. ९ ऑगस्ट रोजी, विभागीय चौकशी करण्यात आली. चव्हाण यांच्याविरुद्ध विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्याचे आढळून आले आहे. या तक्रारीनुसार प्राथमिक चौकशी केली असता, त्यात त्या दोषी आढळून आल्या. नाशिक आयुक्त (शिक्षण), पुणे यांनी शिक्षणाधिकारी चव्हाण यांना शासनसेवेतून निलंबित केले आहे. निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, नाशिक राहणार आहे, असे आदेशात म्हटले आहे.