जळगाव (प्रतिनिधी ) –अक्सेपार्ह विधान केल्याप्रकरणी निलंबती पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्यानंतर आता आता एलसीबीचे सहाय्य्क फौजदार असलेले आणि ज्यांच्याशी संवाद झाला त्या सहाय्यक फौजदार अशोक महाजन यांच्यावरही निलंबनाची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केल्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
मराठा समाजाविषयी बकाले यांनी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर हि क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जिल्हाभरातील मराठा समाजाकडून त्यांना बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून त्यापाठोपाठ त्यांच्यावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच
आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी विनोद पंजाबराव देशमुख (जळगाव) यांच्या फिर्यादीवरून किरणकुमार बकाले (अधिकारी निवास, पोलिस मुख्यालय, जळगाव) यांच्याविरोधात भादंवि 153 अ, 153 ब, 166, 294, 500 व 509 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बकाले यांनी ज्या कर्मचार्याशी संवाद साधताना मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले त्या जळगाव गुन्हे शाखेतील एएसआय अशोक महाजन यांनाही गुरुवारी निलंबीत केले असल्याचे पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी दिली आहे.