भुसावळ ( प्रतिनिधी ) – कुख्यात निखील राजपूत याच्यासह त्याच्या टोळीतील सात जणांवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यात आल्याने गुन्हेगारी क्षेत्र हादरले आहे. भुसावळातील अजून काही गुन्हेगारांवर हद्दपारी आणि मोक्काची कारवाई होण्याचे संकेत देखील मिळाले आहेत.
निखील राजपूत आणि त्याच्या सहकार्यांनी काही महिन्यांपूर्वी पोलिसांवर हल्ला चढविला होता. निखिल राजपूत व टोळीतील सहा साथीदार अशा ७ जणांविरुद्ध ‘मोक्का’ म्हणजेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रस्तावाला नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील यांनी मंजुरी दिली आहे.