मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : स्व.निखील एकनाथराव खडसे यांच्या अकराव्या पुण्यतिथीनिमित्त आदिशक्ती मुक्ताई सहकारी सुतगिरणीतील स्व.निखील खडसे स्मृतीस्थळावर अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष अॅड.रोहिणी खडसे यांनी स्व.निखील खडसे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपस्थितांनी स्व.निखील खडसे यांच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहून आणि दोन मिनिटे मौन बाळगुन स्व.निखील यांना श्रद्धांजली वाहिली.
अॅड.रोहिणी खडसे यांनी स्व.निखील खडसे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या की, स्व.निखील खडसे हे मितभाषी व उत्तम संघटन कौशल्य आत्मसात असणारे व्यक्तिमत्व होत. आपल्या जिल्हा परिषद सदस्य कार्यकाळात त्यांनी अनेक विकास कामे केली. कुणी संकटात असणारा व्यक्ती मदत मागायला आला तर सर्व मतभेद बाजुला सारून ते संकटात असणार्या व्यक्तीला नेहमी मदतीचा हात पुढे करत. समाजातील प्रत्येक लहान थोर मंडळी सोबत त्यांचा संपर्क होता. निखील खडसे यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांना गहिवरून आले.
यावेळी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, तालुकाध्यक्ष यु.डी.पाटी, शहराध्यक्ष राजेंद्र माळी, युवक शहराध्यक्ष बबलू सापधरे, भागवत पाटील, साहेबराव पाटील, प्रवीण पाटील, बापू ससाणे, प्रदीप साळुंखे, रउफ खान, निलेश भालेराव, राहुल पाटील ,भैय्या पाटील, अय्याज पटेल, मुश्ताक मण्यार, पक्ष पदाधिकारी व निखील खडसे मित्र परिवारातील सदस्य उपस्थित होते.