जळगाव ( प्रतिनिधी ) – भुसावळ शहरातील प्रकाश निकमच्या गुन्हेगार टोळीच्या हद्दपारीच्या मागणीसाठी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले गट ) कडून आज जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
निदर्शने केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की , प्रकाश निकम याच्या टोळीच्या हद्दपारीची प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे प्रलंबित आहे या हद्दपारीची मागणीसाठी जनाधार विकास पार्टीच्या नगरसेविका पूजा सूर्यवंशी यांनी ३१ ऑगस्ट रोजी आंदोलनाचा इशारा प्रशासनाला दिला होता. निकम टोळीची भुसावळ शहरात मोठी दहशत असूनही हद्दपार केले जात नाही. ४ महिन्यांपासून हा हद्दपारीची प्रस्ताव प्रलंबित आहे.
गेल्यावर्षीही या टोळीच्या हद्दपारीची प्रस्ताव पोलिसांकडून तयार करण्यात आला होता मात्र प्रकाश निकम यांच्या पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या पदाधिकारी आहेत.त्यांनी वरिष्ठ पातळीवरून राजकीय दबाव आणून तो हद्दपारीचा प्रस्ताव रद्द करून घेतला होता. हा प्रस्ताव रद्द झाल्यानंतर निकम टोळीने भुसावळ शहरात ५ गंभीर गुन्हे केले आहेत. त्यांची नोंद पोलिसांकडे आहे. नव्याने तयार करण्यात आलेले हद्दपारीची प्रस्तावपण निकम टोळी रद्द करून घेण्याच्या प्रयत्नात आहे. पुढच्या १५ दिवसात निकम टोळीच्या विरोधात कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले गट ) कडून देण्यात आला आहे.
या निवेदनावर यावल तालुकाध्यक्ष अशोक बोरेकर , अल्पसंख्यांक आघाडी जिल्हाध्यक्ष ईश्वर इंगळे , जिल्हा कार्याध्यक्ष अशोक तायडे , रावेर तालुकाध्यक्ष विकी तायडे , रावेर शहराध्यक्ष मिलिंद सोनावणे , बोदवड तालुकाध्यक्ष संजय तायडे , सदानंद वाघ , राजू इंगळे , गौतम निकम , रावेर तालुका सचिव कमलाकर गाढे , किरण धिवरे , सत्यभान तायडे, युवक जिल्हा संघटक सचिन भालेराव , अल्पेश तायडे , धोती तायडे , राजेंद्र वाघ , सुरज मोरे , किरण तायडे , विष्णू पारधे , राहुल मोरे , विजय मोरे , अक्षय तायडे , सचिन तायडे , राजू मेढे , प्रल्हाद मोरे , दीपक तायडे , हिरालाल मोरे , रमेश बावसकर आदींच्या सह्या आहेत.