भुसावळ तालुक्यातील निंभोरा येथील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील निंभोरा येथील ३५ वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नाहिद शेख शफीत शेख (वय ३५, निंभोरा, ता. भुसावळ) असे मृताचे नाव आहे. निंभोरा गावातील नाहिद शेख या तरुणाने राहत्या घरी गळफास घेतला होता. त्यास भुसावळातील ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटरमध्ये आणण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. यावेळी कुटुंबियांनी शोक व्यक्त केला. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तरुणाने आत्महत्या का केली? याचे कारण कळू शकले नाही. तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मनोज देऊलकर करीत आहेत.