रावेर ( प्रतिनिधी ) – निंभोरा बुद्रुक येथील गितेश विकास ढाके ( वय १८ ) याचा सुकी नदीत बुडून मृत्यू झाला आहे.
हा तरुण दोन दिवसांपासून बेपत्ता होता. दसऱ्याच्या दिवशी गीतेश ढाके सायंकाळी मित्राकडे जातो , असे सांगून घरून गेला. मात्र , तो परत आलाच नाही. सर्वत्र शोध घेऊन देखील तो आढळला नाही. दुसऱ्या दिवशी निंभोरा पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली होती . सोमवारी सकाळी गीतेशचा मृतदेह सुकी नदीपात्रात तरंगताना आढळला. निंभोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार विकास कोल्हे करत आहेत.