चाळीसगाव( प्रतिनिधी ) – तालुक्यातील न्हावे शिवारात पिकांना खत देण्यास गेलेल्या शेतकरी पट पुत्राच्या अंगावर वीज कोसळून ते दोघे जागीच ठार झाल्याची दुदैवी घटना आज दुपारी येथे घडली असून या घटनेत महिला बचावल्या आहे. या दुर्दैवी घटनेने चाळीसगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
आबा शिवाजी चव्हाण (वय ४५)दीपक आबा चव्हाण (वय १४) असे मयत पिता पुत्राचे नाव आहे.
सूत्रांची दिलेली माहिती आशिकी न्हावे येथे राहणारे शेतकरी आबा शिवाजी पाटील यांनी आपल्या शेतात कापूस पेरला असल्याने ते आपला मुलगा दीपक , पत्नी यांच्यासह आज ९ सप्टेंबर रोजी सकाळी आज शुक्रवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी आबा चव्हाण, पत्नी (नाव माहित नाही) व मुलगा दीपक आबा चव्हाण (वय-१४) हे शेतातील कापसाला खत घालण्यासाठी गेलेले होते. दुपारी २ वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस सुरु झाल्याने त्यांनी शेवगाच्या झाडाचा आधार घेऊन तिथे उभे राहिले. मात्र थोड्याच वेळात अचानक वीज कोसळली. या घटनेत आबा चव्हाण आणि मुलगा दिपक उर्फ विकी आबा चव्हाण हे जागीच ठार झाले. तर इतर बचावले. ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मयताच्या पश्चात पत्नी, मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे न्हावे गावात शोककळ पसरली आहे.