अमळनेर (शहर प्रतिनिधी) – येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने दि.२६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधानाच्या प्रतीचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी रा.स्व.संघाचे विकासराव जोशी,
नरेंद्र निकुंभ,सिनेट सदस्य दिनेश नाईक,प्रकाश ताडे,संजय. विसपुते,प्रा.डॉ.डी.आर.चौधरी, प्रा.ज्ञानेश्वर मराठे,हितेश शहा, विजय पाटील,पंडित नाईक,
संकल्प वैद्य,तन्मय कुलकर्णी, आर.टी.पाटील,भगवान काळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
सर्व उपस्थितांनी प्रतिमेचे व संविधानाचे पूजन केले. त्यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.देवेंद्र तायडे यांनी केले.