जळगाव ( प्रतिनिधी )– विभागीय आयुक्त कार्यालयातील नोंदीनुसार अगदी कालच्या तारखेपर्यंत भगत बालाणी हेच भाजपचे महापालिकेतील गटनेते आहेत या गटनेतेपदाबाबत पेच सुरू असतांना आ. गिरीश महाजन यांचे समर्थक अरविंद देशमुख यांना माहिती अधिकारातून हेच उत्तर मिळाले आहे. यामुळे आता गटनेतेपदावर भाजपचाच हक्क असल्याने उद्या महासभेत बेकायदा निर्णय घेऊ नका असे आवाहन डॉ राधेश्याम चौधरी यांनी महापौर व आयुक्तांना पत्रकार परिषदेत केले .

डॉ राधेश्याम चौधरी पुढे म्हणाले की , शहरातील राजकारणात आतापर्यंत लोकांची दिशाभूल मुद्दाम करण्यात आली आहे मात्र या प्रवृत्तीला भाजप धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी घातकी वृत्ती शासनाची , प्रशासनाची आणि जनतेचीही दिशाभूल करणारी आहे उद्या उद्या महासभेत बेकायदा निर्णय घेऊ नका असे आवाहन आम्ही महापौर व आयुक्तांना करीत आहोत ५ सप्टेंबर रोजीच्या नोंदीनुसार विभागीय आयुक्त कार्यालयाने कालच हि भाजपच्या गटनेतेपदाबद्दलची माहिती दिली आहे अधिकृत भाजप गटनेते भगत बालांनीच आहेत विभागीय आयुक्त कार्यालयातील नोंदी आम्हाला माहिती अधिकार कायद्यानुसार मिळालेल्या असल्याने आता त्याबद्दलची अन्य कोणतीही कागदपत्रे दखलपात्र समजली जाणार नाहीत याची जाणीव भाजपच्या नगरसेवकांनी महापौर आणि महापालिका आयुक्तांनाही करून दिलेली आहे आतापर्यंत ३५ नगरसेवकांनी भाजपला समर्थन दिले आहे फुटीर लोकांना भाजप धडा शिकवणार आहे त्यासाठी न्यायालयात जाण्याचीही भाजपची तयारी आहे
या पत्रपरिषदेत स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे , गटनेते भगत बालांणी, भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी , नगरसेवक विशाल त्रिपाठी , जितेंद्र मराठे आदी उपस्थित होते .







