तालुका प्रमुखपदी जितेंद्र वानखेडे यांची नियुक्ती
पारोळा (प्रतिनिधी) – संपूर्ण भारतामध्ये जबरदस्त संघटन असणाऱ्या व सामाजिक सेवेचा वसा घेतलेल्या भाई चंद्रशेखर आझाद संस्थापित व नेहाताई शिंदे त्यांच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश नेतृत्वात,महाराष्ट्र राज्य प्रवक्ते रमाकांत तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाप्रमुख गणेश सपकाळे समस्त पदाधिकारी यांच्या उत्कट अश्या कार्यशैलीत “भीम आर्मी” भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेचा विस्तार जळगाव जिल्हयात अविरत व जोमाने सुरु असतांना आज दि. १९ सप्टेंबर शनिवार रोजी पारोळा येथे शाखा उदघाटन व पदनियुक्ती चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे यांच्या मार्गदर्शनखाली भीम आर्मी सामाजिक संघटना पारोळा तालुका प्रमुखपदी जितेंद्र वानखेडे यांची तर शहराध्यक्ष म्हणून सचिन नेतकर यांची नियुक्ती करण्यात आली, उर्वरित कार्यकारणी महासचिव- भगवान सोनवणे, उपतालुकाप्रमुख – योगेश महाले , शहर उपाध्यक्ष – कमलेश सोनवणे,
अल्पसंख्याक शहराध्यक्ष- फइम खान पठाण,
तालुका संघटक-भाऊसाहेब सोनवणे, सचिव- सचिन खेडकर, उपसचिव- सतीश पवार,
उपसंघटक विजय शिंदे
तर संजू केदार , उपकार्याध्यक्ष- सिद्धार्थ संदनशिव तर संजू केदार, चाद्रमनी संदनशिव ,सागर सरदार, निलेश कापडणे, अनिल सोनवणे, अमोल साहेबराव संदनशिव, गोकुळ उमप, वाल्मिक सोनवणे, नितीन वानखेडे, शाहरुख पठाण यांची निवड करण्यात आली.
भीम आर्मी सामाजिक संघटनेत काम करून सामाजिक कार्य आणि समाजाच्या अडीअडचणी सोडवने साठी संघटनेची मोठी मदत मिळणार असल्याचे तालुका प्रमुख जितेंद्र वानखेडे यांनी सांगितले.