• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

पालकमंत्री , शिवसेनेचे जेष्ठ नेते गुलाबराव पाटलांवर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 5, 2023
in Uncategorized
0
पालकमंत्री , शिवसेनेचे जेष्ठ नेते गुलाबराव पाटलांवर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव !

जळगाव ( प्रतिनिधी ) राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री, शिवसेनेचे जेष्ठ नेते तथा जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आदल्या दिवसापासून भरगच्च सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. आज सकाळी साडेसात वाजेपासून रात्री पर्यंत पाळधी ग्रामपंचायतीच्या जवळ पालकमंत्र्यांनी शुभेच्छा स्वीकारल्या. येथेच विविध कार्यक्रम पार पडले. तर राज्यातील मान्यवर नेत्यांपासून ते सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत हजारो लोकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. हजारो चाहत्यांचे हे प्रेम पाहून आपण भारावून गेलो असून या ऋणातुन उतराई होणे अशक्य असल्याची भावपूर्ण प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

सकाळीच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पूजा करून देवर्शन घेतले. यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी औक्षण करत पालकमंत्र्यांचे अभिष्टचिंतन केले. यानंतर सकाळी साडेसात वाजेपासून ना. गुलाबराव पाटील हे पाळधी ग्रामपंचायत कार्यालयाजवळच्या कार्यक्रमस्थळी थांबले. येथेच त्यांनी दुपारी बारा वाजेपर्यंत शुभेच्छा स्वीकारल्या. तर सकाळपासूनच विविध जनहितार्थ कार्यक्रमांचे याच ठिकाणी आयोजन करण्यात आले.

पाळधीच्या २२ कोटी रूपयांची पाणी पुरवठा योजना

पाळधी खुर्द आणि बुद्रुक या दोन्ही गावांसाठी ना. गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने तब्बल २२ कोटी रूपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली असून ही सौर उर्जेवर चालणारी राज्यातील पहिली पाणी पुरवठा योजना आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते या योजनेचे उदघाटन करण्यात आले होते. यानंतर ही योजना पूर्णत्वाकडे आली असून यातील जलवाहिन्यांमध्ये पाणी सोडून पाण्याची चाचणी शुभारंभ आज ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यामुळे आता दोन्ही गावांमधील नागरिकांना लवकरच शुध्द पाण्याचा पुरवठा होणार आहे. दरम्यान, पाळधीकरांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन ना. गुलाबराव पाटील यांनी केले. या प्रसंगी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता श्री निकम, जिल्हा परिषद पाणी पुरवठा योजना विभागाचे मुख्य अभियंता गणेश भोगावडे, सरपंच प्रकाश पाटील, संजय महाजन, नारायण सोनवणे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

यासोबत आज सकाळी नेहरू युवा केंद्र जळगाव यांच्या माध्यमातून कॅच द रेन या मोहिमेचा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आला. त्याप्रसंगी जय संचयाची उपस्थितांता शपथ देण्यात आली.

बियाणे व ट्रॅक्टर व कृषी अवजारे वाटप

जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांना मंजुर करण्यात आलेल्या कृषी अवजारांची प्रातिनिधिक स्वरूपात कृषी खात्यातर्फे लहान व मोठे ट्रॅक्टर, कृषी अवजारे, बियाणे आदींचे तालुक्यातील अहिरे येथील शेतकरी लाभार्थ्यांना ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार राजूमामा भोळे, जिल्हा कृषी अधिकारी डॉ. संभाजी ठाकूर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

स्वच्छता जागर प्रारंभ

ना. गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस आणि पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातर्फे स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत स्वच्छतेची जागर यात्रा काढण्यात आली असून आज ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते हिरवी झेंडी दाखवून याचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी विनोद ढगे आणि सहकार्‍यांनी महाराष्ट्र गीतासह स्वच्छता गीत म्हणत जागर केला. यामुळे वातावरण वेगळ्याच चैतन्याने भारावून निघाले. तर पर्यावरण दिनानिमित्त वड, पिंपळ, लिंबू आणि औदुंबर या झाडांच्या मोठ्या रोपांचे वाटप देखील ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

आरोग्य व रक्तदान शिबिरास मोठा प्रतिसाद

पाळधी येथील श्रीराम मंदिरात पालकमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच याप्रसंगी आयुष्यमान भारत योजनेची नोंदणी करून प्राथमिक आरोग्य केंद्रात अन्नदान आणि फळे वाटप करण्यात आली. मुकुंद गोसावी यांनी रक्तदान करून या शिबिराला प्रारंभ झाला. यात दिवसभरात ५८ बाटल्यांचे रक्त संकलन करण्यात आले. या आरोग्य शिबिरातील मनोगतात ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री सहायता निधीतून आजवर आपण सुमारे सहा कोटी रूपयांची मदत गरजू रूग्णांना मिळवून दिली असून भविष्यात देखील याच प्रकारे मदत करण्यासाठी आपण तत्पर राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

मजुरांना मोफत सुरक्षा किटचे वाटप

यासोबत जी.एम. फाऊंडेशन आयोजीत नशिराबाद शिवसेनेतर्फे बांधकाम मजुरांना मोफत सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले. पालकमंत्र्यांनी कामगारांना या किटचे वाटप करत आपली योग्य ती सुरक्षा घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी नशिराबाद येथील प्रदीप साळी, मालतीबाई साळी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

दरम्यान, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आसोदा येथील बसस्थानकावर ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सहकारी सोसायटी आणि ग्रामस्थांच्या वतीने केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी उमेश पाटील, गिरीश भोळे, तुषार महाजन, पिंटू कोळी आदींसह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. यानंतर भादली येथील ग्रामस्थांनी देखील केक कापून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे अभिष्टचिंतन केले. यानंतर जळगाव तालुक्यातील कानसवाडा येथे पाणी पुरवठा योजना आणि व्यायामशाळेचे भूमिपुजन करण्यात आले. येथे वॉटर फिल्टर प्लांट नसल्याने ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांना साकडे घातले असता त्यांनी कानसवाडा येथे प्लांट मंजूर करण्यात येईल अशी ग्वाही दिली. यानंतर पाळधी येथे जातांना महामार्गाला लागून असलेल्या खोटेनर रिक्षा स्टॉपवर जळगाव शहर विधानसभा क्षेत्र प्रमुख राधेश्याम कोगटा, नगरसेवक मनोज चौधरी आणि सहकार्‍यांनी पालकमंत्र्यांचे जंगी स्वागत करत त्यांचे अभिष्टचिंतन केले. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांना भव्य पुष्पहार अर्पण करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी जोरदार आतषबाजी आणि घोषणाबाजीने परिसर दणाणून निघाला होता.

 


 

Previous Post

फाली..उदयोन्मुख नेतृत्व विकासाची वाट – अनिल जैन

Next Post

पोटच्या मुलीवर अत्याचार, नराधम बापास अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मुकबधीर १६ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या एकाला अटक

पोटच्या मुलीवर अत्याचार, नराधम बापास अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon