जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत जळगाव तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा संस्था मतदारसंघातून ६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. महापौर जयश्री महाजन यांच्या उमेदवारी अर्जावर आमदार राजूमामा भोळे यांनी घेतलेला आक्षेप निवणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळल्याने महापौर जयश्री महाजन मैदानात उतरल्या आहेत.
आमदार राजूमामा भोळे यांचे सूचक चंद्रकांत त्र्यम्बक पाटील यांनी हा आक्षेप घेतला होता . एका संस्थेविषयी हा आकेशिप घेण्यात आला होता हा आक्षेप फेटाळल्या गेल्याने आता जळगाव तालुका विविध कार्यकारी सेवा संस्था मतदारसंघातील आमदार राजूमामा भोळे आणि महापौर जयश्री महाजन यांच्यातील लढत आता अत्यंत प्रतिष्ठेची झाली आहे. या लढतीला शहराच्या राजकारणाचे कंगोरे असल्याने आणि भाजप विरोधात शिवसेना अशा संघर्षाची किनार असल्याने आता पालकमंत्र्यांसाठीही ही लढत प्रतिष्ठेची झाली आहे
जळगाव तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा संस्था मतदारसंघातून उषा पाटील , योगेश पाटील , महापौर जयश्री महाजन , आमदार राजूमामा भोळे , जयश्री गणेश सोनवणे , राजेंद्र शिंदे यांचे अर्ज वैध ठरले आहेत
या मतदार संघात निवडणूक होणे अटळ असल्याने भाजप आणि शिवसेना थेट आमने सामने आल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील , भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांचे डावपेच आणि दुसरीकडे जळगाव तालुक्यातील पक्षीय संघर्ष असा संघर्ष होणार आहे .