भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ शहरातील शासकीय कामात अळथळा केलेल्या गुन्ह्यातील फरार असलेला संशयित आरोपी याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. याप्रकरणी पुढील कारवाई साठी भुसावळ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
प्रशांत उर्फ गोलू युवराज ठाकूर रा. हनुमान नगर याला शासकीय कामात अळथळा केल्या प्रकरणी त्यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ठाकुर याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भुसावळ मधून ताब्यात घेऊन भुसावळ बाजार पेठ पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील सहाय्यक फैाजदार अशोक महाजन, पोहेकॉ लक्ष्मण पाटील, पो.ना. श्रीकृष्ण देशमुख, पो.ना. रणजित जाधव, पो.ना. किशोर राठोड, विनोद पाटील, ईश्वर पाटील यांनी ही कारवाई केली आहे.
पुढील कारवाईसाठी भुसावळ बाजार पेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.