जळगाव ( प्रतिनिधी ) – महापालिकेने सुधारित कर मूल्यांकन रद्द करावे अशी मागणी जाधवराव प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण जाधव यांनी आयुक्तांकडे केली आहे
महापालिकेला दिलेल्या निवेदनात प्रवीण जाधव यांनी म्हटले की, म.न.पा.हद्दीतील रहिवाशांना प्रस्तावित करयोग्य मुल्य – अपेक्षित करयोग्य मूल्यात परावर्तित करून वितरण संदर्भातील नोटीस पाठवल्या आहे. सन २१-२२ मध्ये अधिकचा कर वसूल करणार आहात करयोग्य मुल्यात तीनपट वाढ करणार आहात पर्यायाने त्या प्रमाणात करवाढ झाली आहे.
केवळ शासन पत्रकाचा आधार घेऊन म.न.पा.तिजोरी भरण्यासाठी हे करणे योग्य नाही त्यासाठी दुसरे मार्ग आहेत. न्यायलय यांचे आदेश असलेल्या गाळेधारकांच्या वसुल्या सोडून सामान्यावर सक्ती ठीक नाही. कंबरमोड रस्ते असलेले जळगांव शहर नव्हे तर मोठ्यावस्तीचे खेडेगांव आहे. तुंबलेल्या गटारी उच्चतम प्रदूषण पाहता आणि, आता कोविड महामारीचा विचार करता असे करणे हा सहनशील जनतेवर अन्याय म्हटला जाईल आम्ही विहित नमुन्यात हरकतीसुदुधा सादर करत आहोत








