जळगाव राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मध्ये आता 100 टक्के प्रवासी वाहतूक करता येणार आहे. याबाबतचे परिपत्रक राज्य एस टी महामंडळाने गुरुवारी काढले आहे.

करोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर 20 ऑगस्ट रोजी सामाजिक अंतर राखून 50 टक्के क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली होती. आता गुरुवारी 17 रोजी राज्य परिवहन महामंडळाने परिपत्रक काढले आहे. त्यात म्हटले आहे की, कर्नाटक व गुजरात राज्यात 100 टक्के प्रवासी वाहतुक सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने पूर्ण आसन क्षमतेने करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी प्रवाशांनी मास्क व सॅनिटायझर लावणे गरजेचे आहे. बसेस निर्जंतुक करूनच सोडाव्यात. प्रवासासाठी पूर्वीच्या पद्धतीने आरक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करावी, नियत व फेऱ्यांचे सुसूत्रीकरण करण्यात यावे, असेही परिपत्रकात वाहतूक महाव्यवस्थापक यांनी म्हटले आहे.







