राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरणाचा उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी) – सुप्रीम कोर्टाच्या अंतर्गत नालसा यांच्या अंतर्गत २ ऑक्टोबर २०२१ पासून ४५ दिवसाचे कार्यक्रम संपूर्ण भारतात आयोजित करण्यात आलेले आहे. पँन इंडिया अवेरनेस या कार्यक्रमाचा उद्दिष्ट असून प्रत्येक पोलीस स्टेशनला कायदेविषयक बोर्ड लावण्यात आले आहे. त्या कायदेविषयक बोर्डाचे माहिती म्हणजे आरोपीला अटक करणे अगोदर चे अधिकार आणि आरोपीला अटक झाल्यानंतर चे अधिकार असे माहिती व्हावे यासाठी माहितीफलक भारतातील प्रत्येक पोलीस स्टेशनला आज जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते प्रत्येक पोलीस स्टेशनला लावण्यात येत आहे.
आज जळगाव शहरातील जिल्हा पेठ पोलीस स्टेशन मध्ये या फलकाचे अनावरण जिल्हा सत्र न्यायाधीश श्री. एस.जी. ठुबे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे पो.नि. रामदास वाकोडे,अँड. विजय दर्जी,एपीआय कीशोर पवार,पी.एस आय प्रदिप चांदेकर,विधी सेवा प्राधिकरणाचे ए.पी.कुळकर्णी,गणेश निबांळकर, पीएलव्हि जितेंद्र सोनवणे, लाँ विद्यार्थ्यांनी पल्लवी मिसाळ,हे.काँ. महेंद्र बागुल सह इतर सहकारी कर्मचारी वृद्ध उपस्थित होते.