अमळनेर ( प्रतिनिधी ) – आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना अद्ययावत करण्याचे काम सुरु झाले आहे. नगरसेवकांची व प्रभागाची संख्या वाढली आहे. त्यामुळे आपण लक्ष देवून कामे केलेला भाग मिळणार की दुर्लक्ष केलेला भाग आपल्याकडे येणार? याची चिंता इच्छुकांना सतावते आहे.
प्रभाग रचनेनंतर सोयीच्या प्रभागाची मागणी सर्वच इच्छुक पक्षनेत्याकडे करतील. मात्र इच्छुकातील स्पर्धा लक्षात घेवून प्रत्येक पक्ष सोयीचे राजकारण करुन उमेदवारी निश्चित करणार आहे. त्यामुळेच ज्या भागाकडे मत मिळाली नाही, म्हणून ज्या विद्यमान नगरसेवकांनी दुर्लक्ष केले. नेमके त्याच प्रभागातून पक्षाने उमेदवारी दिल्यास विद्यमान नगरसेवकांनी केलेले दुर्लक्ष त्यांना भोवण्याची शक्यता नाकारता येत नाही.