जळगाव ( प्रतिनिधी )– एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपादरम्यान एसटीच्या आगारप्रमुख महिला अधिकाऱ्यांशी गैरवर्तणुक केल्याने अमळनेर आगारातील चार कर्मचारी निलंबित करण्यात आले.
अमळनेर आगारात संपादरम्यान संपात सहभागी व्हा; असा आग्रह धरीत गळ्यात हार टाकत महिला आगार प्रमुखाशी गैरवर्तवणुक केल्याचा प्रकार सोमवारी घडला. या तक्रारीनुसार विभाग नियंत्रकांनी अमळनेर आगारातील योगेश घोडके, शीतल पाटील, प्रवीण मिस्तरी व किरण पाटील या चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले.
एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनकरण ही कामगारांची प्रमुख मागणी आहे. त्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे. तिसऱ्या दिवशी संपाची तीव्रता अधिक वाढल्याने परिवहन विभागाने संपकऱ्यांवर कारवाईचा निर्णय घेतला. एसटी कर्मचारी संपावर आहेत. यात परिवहनमंत्री अनिल परब यांच्या निर्देशानुसार राज्यभरात कारवाईचे सत्र सुरु आहे. राज्यातील साडेतीनशे कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यात जिल्ह्यातील चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.







