एरंडोल( वार्ताहार) – सतत दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे हे तर खरीप हंगामाला मोठी संजीवनी या पावसामुळे मिळालेली आहे.

गेल्या १० ते २० दिवसापासून पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम संकटात सापडलेला होता. परंतु गेल्या २ दिवसात तालुक्यात होणाऱ्या पावसामुळे खरीप हंगामाला मोठी संजीवनी मिळाली असून शेतकरी वर्गाला दिलासा मिळालेला आहे शेतकऱ्यांची पावसाअभावी रखडलेली कामांना गती मिळणार आहे .या पावसामुळे खरीप हंगामातील कोमेजलेल्या पिकांना पुन्हा बहर येईल रासायनिक खत कीटकनाशक यांची मागणी या पावसामुळे आता वाढणार आहे.
अंजनी मध्यम प्रकल्प भालगाव प्रकल्प खडके प्रकल्पात फार कमी प्रमाणात जलसाठा असून पावसाने पाठ फिरवलेल्या मुळे पिण्याचे पाण्याचे संकट निर्माण होणार होते. आज ही या प्रकल्पाला परिसरात दमदार पावसाची अपेक्षा आहे तालुक्यात ४ मंडळ असून यात काल झालेले पाऊस खालील प्रमाणे झालेले आहेत एरंडोल 69 एम एम, रिंगणगाव 73 एम एम, कासोदा 52 एम एम ,उत्राण 48 एम एम, इतकी पावसाची नोंद झालेली आहे.







