जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात लॉक डाउन सुरु असतांना शहरातील राज वाईन्सच्या सिलबंद गोडावूनमधून बाहेर काढलेली आणि बेकायदेशीर खासगी वाहनातून नेली जात असलेली दोन लाखाची देशी विदेशी दारू स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज सकाळी त्या वाहनासह जप्त केली हा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अटक करत गुन्हा दाखल करण्यात आला.
अजिंठा चौफुलीवरील राज वाईन्समधून आज पहाटे ३.४५ वाजेच्या सुमारास तिघेजण खासगी वाहनाने बेकायदेशीर देशी विदेशी दारू घेवून जाणार असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांना मिळाली होती त्यावरून एलसीबी कर्मचाऱ्यांनी खातरजमा केल्यावर सकाळी कारवाई करत राज वाईन्सजवळ खासगी कार क्रमांक (एमएच १८ डब्ल्यू ९८४२)ची तपासणी केली या कारमध्ये २ लाख रूपये किंमतीचे देशी विदेशी दारू बंद खोक्यांमध्ये आढळून आली. पोलिसांनी चौकशी केल्यावर या आरोपींकडे कोणताही परवाना नसल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे कारसह संशयित आरोपी राज वाईन्सचे मालक दिनेश राजकुमार मोठवाणी ( रा. आदर्श नगर) यांच्यासह नितीन श्यामराव महाजन, महेंद्र अशोक भावसार (दोन्ही रा. अयोध्या नगर ) या तिघांना अटक करण्यात आली. दोन लाख रूपये किंमतीची देशी विदेशी दारू आणि तीन लाखाची कार असा हा ५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांच्या मार्गदर्शनखाली पोहेकॉ राजेश मेढे, संजय हिवरकर, सुनिल दमोदरे, रविंद्र घुगे, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, दर्शन ढाकणे, महिला पोलीस कर्मचारी वाहिदा तडवी, चालक रमेश जाधव, अशोक महाजन यांनी ही कारवाई केली.