चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – लोंढे-चिंचगव्हाण शिव रस्त्यांचा जटिल प्रश्न सोडविल्याबद्दल शेतकऱ्यांनी आमदार मंगेश चव्हाण व गुणवंत सोनवणे यांचे आभार मानले आहेत . या रस्त्याचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले .
लोंढे येथील चिंचगव्हाण शिवार रस्ता त्रासदायक होता. कित्येक निवडणुका, मेळावे, बैठका ह्या रस्त्यांच्या दुरुस्ती- बांधणीवरुन होऊन गेल्या, हा रस्ता झालाच पाहिजे असा सुर लोकांमधून नेहमी निघायचा.
हा एकूण दोन किमी लांबीचा रस्ता चिखल, पाण्याचे डबके, दुतर्फा झुडपांनी वेढलेला, ना पायी जाता येई. ना बैलगाडीने. बैल, शेळ्या, मेंढ्या त्या ठिकाणी फसून मेल्याच्या घटना घडल्या आहे. शेतमाल डोक्यावर आणावा लागे. मिळेल तशी वाट काढली जात असल्याने शेतांतील पिकांचे नुकसान होत असे.
शेतकऱ्यांनी शिवनेरी फाउंडेशन संचलित भूजल अभियानांचे तर्गत प्रकल्प समन्वयक राहुल राठोड यांच्या माध्यमातून आमदार मंगेश चव्हाण व गुणवंत सोनवणे यांची भेट घेतली. त्यानंतर कामाला सुरुवात झाली आमदार मंगेश चव्हाण व गुणवंत सोनवणे यांनी सेवासहयोग फाउंडेशनकडून जेसीबी मशीन उपलब्ध करून दिले व शेतकऱ्यांकडून डिझेल खर्चासाठी वर्गणी करण्यात आली
२ किमी लांबीचा रस्ता केवळ ३०० लिटर डिझेल खर्ची घालून तयार झाला. यात शासनाचे अंदाजे ७ लाख रुपये वाचले यासाठी शेतकरी ४० वर्षापासून वाट पाहत होते. ते काम काही दिवसात झाले दोन गाड्या एकावेळेस जातील व येतील असा रस्ता तयार झाला
या रस्त्याच्या लोकार्पण प्रसंगी आ. मंगेश चव्हाण व गुणवंत सोनवणे यांच्यासह पं स सदस्य पियूष साळुंखे, जि प सदस्य अनिल गायकवाड, प्रा.सुनिल निकम , नगरसेविका सविता राजपूत, सरपंच राहुल सोनवणे, उपसरपंच जयाजी भोसले, राजु पवार, भैया देवरे, प्रविण राठोड, सायबु निकम, हिरामण सोनवणे , निवृत्ती ज्याधव , तुकाराम जाधव, रमेश निकम सुरेश निकम, प्रमोद निकम , कांतीलाल जाधव , अनिल सोनवणे , चेतन भोसले , अरुण ठाकरे, ,भानुदास भोसले , शिवाजी निकम , हर्षल जाट, ललीश शिंदे , एकनाथ निकम , विठ्ठल निकम, दगडू निकम , नगराज निकम , विजय भोसले , टेकणेश्वर निकम , संजय निकम , चंदू भोसले , शेखर भोसले, महेश भोसले , विनोद निकम , शेखर निकम, भटू निकम , विकी निकम , देविदास पाटील , भोला निकम , रावसाहेब निकम , गौतम बागुल , अशोक पवार , बंडू भोसले , भिकन भोसले , दगडू भोसले , बापू निकम, लोटन निकम, भावडू निकम , आबा साबळे , शिवाजी पाटील , मयूर निकम , आबा गवारे , भटू कापसे , समीर , संजू चोधरी , रवींद्र निकम , भटू निकम , समाधान निकम, सोनू दणके, रुपसिंग जाधव, कोमलसिंग जाट, निबा सोनवणे , राहुल राठोड, सरपंच सुभाष राठोड, नवल पवार, दयाराम सोनवणे, शाम सोनवणे, पंकज राठोड, अमोल गायकवाड, कोमलसिंग जाट, सुनील भोसले आदी ग्रामस्थ उपस्थित होते