भडगाव ( प्रतिनिधी ) – नाल्याला आलेल्या पुरात तालुक्यातील गुढे येथील रहिवाशी भीमा रामा माळी यांचा वाहुन गेल्याने सप्टेंबररोजी मृत्यू झाला होता त्यांच्या कुटुंबाला शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन निधी अंतर्गत चार लाखांचा धनादेश आ.किशोर पाटील यांचे हस्ते देण्यात आला

मयताची पत्नी भागाबाई माळी यांना त्यांचे गुढे येथील घरी जात आमदारांनी धनादेश सुपूर्द केला. पंधरा दिवसात मयताच्या वारसांना शासकीय मदत मिळाल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी तहसीलदार मुकेश हिवाळे, माजी जि प सदस्य विकास पाटील, जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील ,शिवसेना तालूका प्रमुख डॉ विलास पाटील , सरपंच प्रकाश पाटील, किसन माळी, केलास माळी, भगवान महाजन ,सखाराम माळी, तुकाराम माळी यांची उपस्थिती होती.







