पाचोरा ( प्रतिनिधी ) – कजगाव रेल्वेस्थानकाजवळ अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळून आला आहे .
कजगाव रेल्वे स्थानक नजीक रेल्वे कि. मी. खंबा क्रंमाक ३४६/९ जवळ ५ जुलै रोजी अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळला आला या घटनेची माहिती पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्र यांना मिळताच पथकाने घटनास्थळी जावून पंचनामा केला. मयत इसमाचे अंदाजे वय ४० वर्ष, उंची – ५ फुट, रंग – काळा सावळा, शरीर बांधा – सडपातळ आहे. त्याच्या अंगावर हिरव्या रंगाचे फाटलेल्या स्थितीतील बनियान आहे. या मयताबाबत कोणास काही माहिती असल्यास भ्रमणध्वनी क्रमांक 9890633435 वर संपर्क करावा असे आवाहन पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रातर्फे करण्यात आले पुढील तपास ए. एस. आय. ईश्वर बोरुडे , हवालदार एस. एम. बोरसे हे करित आहेत .