जळगाव (प्रतिनिधी) – दाणा बाजार येथील दत्त मंदिराजवळ स्वामी विवेकानंद व मासाहेब जिजाऊ यांची जयंती आज उत्साहात साजरी करण्यात आली.
महापौर.जयश्री महाजन यांनी हार अर्पण व प्रतिमापूजन केले . रिध्दी जान्हवी फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा चित्रलेखा मालपाणी यांनी दाणा बाजार येथे पेढे व गरीब मुलांना कपडे वाटप केले. कोरोना आपत्तीच्या उपाययोजनेची दक्षता म्हणून उपस्थित नागरिकांना महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते मास्क वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला पद्मावती राणा , सविता दायमा, .संगीता समदानी, सपना समदानी, नितेश पानसर, शेखर पाटील, विनोद चौधरी, भावेश सोनार, दत्तात्रय चौधरी, मधुकरराव बारी, बंटी बांदल, शिवाजी दळवी, बबनराव आरसुड, आदिनाथ काकडे, शेखर पाटील, विनोद कोळी, सोनू नेवे, भिकचंद झंवर, शुभम दायमा यांची उपस्थिती होती.