पाचोरा ( प्रतिनिधी ) – शहरातील कोरोना लसीकरण शोध मोहिमेत गो से हायस्कूलचे शिक्षक आणि शिक्षिका सहभागी झाल्या आहेत .
सध्या पाचोरा नगरपालिका आरोग्य विभाग यांच्या आदेशानुसार लसीकरण बाकी असलेल्या नागरिकांची घरोघरी जाऊन विचारपूस करून कोरोना लसीकरण बाकी असलेल्या नागरिकांची माहिती घेतली जात आहे सर्वे करण्यात येत आहे प्रभाग क्रमांक एक मधील हनुमानवाडी, नागसेन नगर, थेपडे नगर, आशीर्वाद ड्रीम सिटी, रेणुका कॉलनी, मिलिंद नगरमधील कोरोना लसीकरण बाकी असलेल्या नागरिकांची माहिती घेऊन जनजागृती करण्यात येत आहे यासाठी गो . से . हायस्कुलचे सकाळ व दुपार सत्रातील सर्व शिक्षक आणि शिक्षिका यांनी परिसर पिंजून काढला आहे . लसीकरण बाकी असलेल्या नागरिकांची माहिती गोळा करण्याचे काम शिक्षक करत आहेत
यासाठी मुख्याध्यापक सुधीर पाटील , उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ, पर्यवेक्षक एन आर पाटील , आर एल पाटील, ए बी अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक बंधू-भगिनी काम पाहत आहेत नागरिकांमध्ये जागृतीचे काम सुरू आहे लवकरात लवकर हा प्रभाग लसीकरणयुक्त होईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत