यमुनाबाई ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने पद होते रिक्त
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील कुसुंबा खुर्द येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मीना अशोक पाटील यांचा निवडणुकीत विजय झाला आहे. पराभूत उमेदवार भारती प्रवीण पाटील यांचा त्यांनी ३ मतांनी पराभव केला.
गावच्या माजी सरपंच यमुनाबाई ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर पद रिक्त झाले होता. याकरिता गावात निवडणूक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी सारिका दुरगुडे होत्या. यात मीना अशोक पाटील यांना १० मते तर भारती प्रवीण पाटील यांना ७ मते मिळाली. यानंतर मीना पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन मंडळ अधिकारी सारिका दुरगुडे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत भाऊलाल पाटील, श्रावण कोळी, अश्विनी पाटील, यमुनाबाई ठाकरे, बेबाबाई तडवी उपस्थित होते. मंडळ अधिकारी यांना तलाठी तांडगे, ग्रामविकास अधिकारी जयपाल चिंचोरे यांनी सहकार्य केले.