जळगाव (प्रतिनिधी) – येथील रेमण्ड लिमिटेड आस्थापनेतील कामगार कोरोना महामारीमुळे बेरोजगार झाले आहेत. कायम कामगार व कुटुंबीयांची उपासमार होऊ नये म्हणून खान्देश कामगार उत्कर्ष संघटनेचे संघटक ललित कोल्हे यांच्या पुढाकाराने रेमण्ड वेवस्थापनाशी झालेल्या चर्चेअंतीं बेरोजगार झालेल्या कायम कामगारांना अर्धे वेतन देण्याचे ठरले आहे.
प्रारंभी वेवस्थापनाने अर्धे वेतन देण्यास असमर्थता दर्शविली होती. परंतु कामगारनेते ललित कोल्हे यांनी जोरदार मागणी केली. कामगारनेते ललित कोल्हेच्या ह्या चांगल्या प्रकारच्या दबावाचा व्यवस्थापनावर असर झाल्यानेच हा निर्णय घेणे शक्य झाले आहे. कायम स्वरूपी काम करीत असलेल्या जुन्या व नव्या कामगारांना ह्या निर्णयाचा लाभ घेता येईल.