जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील सागर पार्कच्यामागे असणाऱ्या रामदास कॉलनीत असलेल्या मोकळ्या जागेवर २ कोटी रुपये खर्चून भव्य नाना-नानी पार्क साकारण्यात येणार आहे. मनपा महासभेत बुधवारी या कामाला मंजुरी देण्यात आली.
नाना – नानी पार्कच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती महापौर भारती सोनवणे यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. कामाचा एक अंदाजित ले आउट देखील तयार करण्यात आलेला आहे. रामदास कॉलनीत नाना – नानी पार्क तयार झाल्यास नागरिकांसाठी फिरायला हक्काची जागा उपलब्ध होईल. तसेच जेष्ठ नागरिकांना विसाव्यासाठी देखील हक्काची व्यासपीठ उपलब्ध होणार आहेत. या नाना-नानी पार्कमध्ये जेष्ठ नागरिकांना त्यांच्या वयानुसार व्यायामाची सुविधा असावी, तसेच सुरक्षा व्यवस्था सुद्धा असावी अशी अपेक्षा आहे.