जळगाव (प्रतिनिधी) – येथील मेहरूणच्या कसाईवाड्यात 30 ऑगस्ट रोजी झालेल्या मारहाणीत दाखल गुन्ह्यात फरार झालेल्या एका संशयित आरोपीस एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकाने बुधवारी रात्री मास्टर कॉलनीतुन अटक केली आहे.
जब्बार शेख गफूर कुरेशी (वय ४९, रा.अकसा नगर) असे अटक केलेल्या संशयितांची नाव आहे. पिरजादे वाड्यातील रहिवासी इकबालोद्दीन पिरजादे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, 30 ऑगस्ट रोजी दुपारी त्यांची चोरी झालेली गाय शोधण्यास गेले असताना काही जणांनी त्यांना जबर मारहाण केली होती. यात जनावरे कापण्याचा सूरा तसेच दगड, लाठ्याकाठ्यांनी मारून फिर्यादीला जखमी केले होते. या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी एकूण 14 संशयित आरोपींवर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. त्यात जब्बार शेख हा मास्टर कॉलनी येथे आला असल्याची माहिती गुन्हे शोध पथकातील पोलीस नाईक मुद्स्सर काझी यांना मिळल्यावरून संशयित आरोपीला पळून जाण्याआधी गजाआड केले.
कारवाई पोऊनी संदीप पाटील, सफौ अतुल वंजारी, मुद्स्सर काझी, सचिन पाटील, योगेश बारी, अश्फाक शेख यांनी केली. तपास पोऊनी संदीप पाटील करीत आहेत.