चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – टाकळी येथे माहेर असलेल्या २९ वर्षीय विवाहितेचा पैशांच्या मागणीवरून शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या पतीसह सात जणांविरोधात चाळीसगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टाकळी येथे माहेर असलेल्या २९ वर्षीय विवाहितेचा विवाह तालुक्यातील रोहिणी येथील बाळासाहेब बळीराम नागरे यांच्याशी 2005 मध्ये झाला. लग्नाच्या एक वर्षापर्यंत सासरच्या मंडळींनी चांगली वागणूक दिली. नंतर पती बाळासाहेब नागरे याने विवाहितेचे मामा बाजीराव सोनवणे यांच्याकडून १० हजार रुपये आणण्याची मागणी केली. ती मागणी पूर्ण न केल्याने पतीने शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरवात केली. त्यानंतर सासरे बळीराम नागरे, सासू जनाबाई नागरे, जेठ शांताराम नागरे, जेठाणी सविता नागरे, नणंद शोभा डिघोळे यांनी पती बाळासाहेब नागरे यांचे कान भरून वेळोवेळी शिवीगाळ व मारहाण करण्यास सांगितले. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी टाकळी येथे निघून आल्या. चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पो ना शैलेंद्र पाटील करीत आहेत .