बोदवड ( प्रतिनिधी ) – बोदवड नगर पंचायतीच्या निवडणुकीत आज शहरातील गांधी चौकात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीर प्रचार सभा होत आहेत . पालकमंत्र्यांनी नाथाभाऊंवर केलेली टीका गाजत असतानाच आता भाजपच्या प्रचारसभेत नेते काय बोलतात ?, याची उत्सुकता वाढली आहे .
बोदवड नगर पंचायत मतदान प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने भाजप व राष्ट्रवादी यांच्या सभेचा कार्यक्रम गांधी चौकात आयोजित केलेला आहे भाजपाकडून आ गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे व उन्मेष पाटील , आमदार राजूमामा भोळे , आमदार संजय सावकारे हे व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत
राष्ट्रवादीतर्फे माजीमंत्री एकनाथ खडसे , रा.कॉ जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील व रोहीणी खडसे हे उपस्थित राहणार आहेत . सभेचे ठिकाण गांधी चौकात समोरासमोर एकाच वेळेस असल्याने सभांची चर्चा पुर्ण तालुक्यांत होतं आहे आमदार गिरीश महाजन व एकनाथराव खडसे एकमेकांबद्दल काय बोलतात याची उत्सुकता बोदवड तालुका व संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरणार आहे