जळगांव ( प्रतिनिधी) – विधानसभा अध्यक्ष मा. नामदार नाना पटोले हे उद्या (रविवार, दि. 10 मे) जळगांवात येत आहेत.
विधानसभा अध्यक्ष मा. नामदार नाना पटोले यांच्या या दौर्याबाबत जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ते रविवारी (रहाटे कॉलनी) नागपूर येथून शासकोय मोटारीने (बाहन क्र..एमएच-31 एफए 1895 ) जळगांबकडे सकाळी साडे आठ वाजता प्रयाण करतील . दुपारी दोन वाजता जळगावातील अजिंठा शासकीय विश्रामगृहात त्यांचे आगमन होईल. त्यानंतर ते दुपारी तीन वाजता जळगावातून मुंबईकडे प्रयाण करतील .
त्यांच्यासोबत अनंत जगताप (विशेष कार्य अधिकारी ) हे असतील , असे जळगावच्या निवासी उपजिल्हाधिकार्यांनी सांगितले .
विधानसभा अध्यक्ष मा. ना. नाना पटोले जलगावात असताना उपविभागीय अधिकारी श्रीमती दिपमाला चौरे त्यांच्या संपर्क अधिकारी म्हणून राजशिष्टाचाराची पूर्तता करतील .







