नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – करोनाचा प्रसार रोखण्यासाठी ३ मे नंतर लॉकडाउन वाढवताना केंद्राने काही बाबतीत शिथिलता दिली. त्यामुळे अनेक राज्यांनी जीवनावश्यक असलेल्या व जीवनावश्यक नसलेल्या वस्तुंची दुकानं खुली करण्यास परवानगी दिली होती. यात दारूविक्री करण्यालाही परवानगी देण्यात आली. मात्र, या निर्णयानंतर देशभरात सगळीकडे गोंधळ उडाला. सोशल डिस्टंसिंगचा पुरता फज्जा उडाला. दरम्यान, याच मुद्यावर दिल्लीतील मद्यप्रेमींनी अनोखी शक्कल लढवत तोडगा काढला आहे.
ANI
✔
@ANI
Delhi: People keep helmets, water bottles, bags and their other belongings to mark their positions in queues outside liquor shops in Gole Market. #CoronavirusLockdown
View image on TwitterView image on TwitterView image on TwitterView image on Twitter
324
7:14 AM – May 9, 2020
Twitter Ads info and privacy
64 people are talking about this
दिल्लीतील गोल बाजारात दारू घेण्यासाठी लोकांनी पहाटे पासूनच गर्दी केली होती. मात्र इथे असलेल्या काही हुशार मद्यप्रेमींनी रांगेत उभे राहण्यापेक्षा आपल्या जागेवर आपली दुसरी कोणती तरी वस्तू ठेवणे पसंत केले. मद्यप्रेमींनी त्यांच्या जागी हेल्मेट, बाटल्या आणि इतर वस्तू ठेवल्याचे दिसले. दिल्लीत मद्यासाठी दुकानाबाहेर लांबच लांब रांगा असल्याने आपला नंबर येईपर्यंत ऊन होणार या विचाराने काही लोकांनी उन्हापासून वाचण्यासाठी ही अनोखी शक्कल लढवल्याचे पाहायला मिळत आहे.