न्यूयॉर्क (वृत्तसंस्था) – जगातील 212 देशांमध्ये कोरोनाने चांगलाच थैमान घातला आहे. मागील 24 तासात 96,927 नवीन कोरोनाबाधित रुग्ण समोर आले आहेत. तर 24 तासात 5,533 लोकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.
वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत मृत्यूंची संख्या जगभरात 2 लाख 75 हजार 959 वर पोहोचली आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 40 लाख 10 हजार 571 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 13 लाख 82 हजार 333 रुग्ण बरे झाले आहेत. जगातील 73 टक्के कोरोनाबाधित हे केवळ दहा देशांमध्ये आहेत. या दहा देशांमध्येच 29 लाख कोरोना रुग्ण आहेत.
जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. जगात जवळपास एक तृतीयांश कोरोना केसेस तर एक चतुर्थांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत 1,321,666 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 78,599 लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.
अमेरिकेनंतर स्पेनमध्ये कोविड-19 मुळं 26,299 लोकांचा मृत्यू झालाय. 260,117 लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली दुसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 30,201 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 217,185 इतका आहे.