मुंबई (वृत्तसंस्था) – ठाण्यातील एका तरुणाने मारहाणीचा गंभीर आरोप केला आहे. यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड सध्या वादात सापडले आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात फेसबुकवर पोस्ट लिहिली याच कारणामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि पोलिसांनी आव्हाड यांच्या बंगल्यावर नेऊन मला मला मारहाण केली,’ असा आरोप या तरुणाकडून करण्यात आला आहे. यानंतर राज्याचे राजकारणारही चांगले तापले आहे. भाजपने तर आव्हाड यांना धारेवर धरले आहे.
भाजपकडून जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिपदावरून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. यासोबतच भाजपच्या इतर नेत्यांनीही आव्हाडांवर जोरदार टीका केली. या सर्व टीकेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी आपलं दु:ख जाहीरपणे व्यक्त केलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्वीट केलं आहे. या ट्विटसोबत त्यांनी त्यांना सोशल मीडियावर देण्यात येत असलेल्या धमक्यांचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. यासोबतच आपल्या भावनाही मांडल्या आहेत. ‘हे मी पाच वर्ष भोगले…घराची रेकी झाली…कुणी केली… हत्या करण्याचे ठरले…कोण होते त्यात…असो…आईचे आशीर्वाद…पोलीस कारवाई करतील यावर,’ असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. है मी पाच वर्ष भोगले, घराची रेकी झाली, कुणी केली, हत्या करण्याचे ठरले, कोण होते त्यात असो आईचे आशीर्वाद
पुलिस कारवाई करतील ह्यावर@OfficeofUT @AnilDeshmukhNCP @ThaneCityPolice @MumbaiPolice @CPMumbaiPolice pic.twitter.com/mk6fMEWjTI – Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 9, 2020