जळगाव (प्रतिनिधी) – गोदावरी कृषि शिक्षण संकुल,जळगाव परिसर व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने १ मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सर्वप्रथम १०५ हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, डॉ. उल्हास पाटील कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय व डॉ. उल्हास पाटील कृषि अन्नतंत्र महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, परीक्षा विभागाचे विभाग प्रमुख व डॉ.अशोक चौधरी (शिक्षण व संशोधन संचालक), प्रा. आर. डी. चौधरी, (क्रीडा अधिकारी), प्रा.अतुल बोंडे (उपकुलसचिव) रा. सो. यो. चे तिन्ही महाविद्यालयाचे कार्यक्रम अधीकारी, व सर्व प्राध्यापक/प्राध्यापिका , कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम कृषि शिक्षण संकुल परिसराचे शिक्षण व संशोधन संचालक डॉ.अशोक चौधरी यांनी १०५ हुतात्म्यांना अभिवादन करून ध्वजारोहण केले. यावेळी धीरज सैतवाल यांनी महाराष्ट्राची भौगोलिक माहितीपर मार्गदर्शन केले. तसेच काही विद्यार्थ्यांनी भाषणे दिली.
यावेळी डॉ.अशोक चौधरी यांनी महाराष्ट्र दिनाचे महत्त्व सांगितले. प्रा.सुमेध इंगळे यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा अधिकारी प्रा. आर डी चौधरी यांनी केले. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शैलेश तायडे यांनी संयुक्त महाराष्ट्रातुन महाराष्ट्र कसा निर्माण झाला यावर सविस्तर माहिती दिली. कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर. सपकाळे महाराष्ट्र दिनाचे महत्त्व सांगून आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कृषि विस्तार शिक्षण विभागाचे प्रा. गोणशेटवाड बी. एम. यांनी केले. कार्यक्रमाचे सर्व आयोजन डॉ. ललित जावळे, कुंदन धनगर, सचिन पाटील, माधुरी पाटील व सारिका पाटील यांनी केले.