जळगाव (प्रतिनिधी) नाशिकहून आलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकासह एकूण सहा पथकांनी आज जळगावातील विविध दारू दुकानांवर धाडी टाकून तपासणी सुरु केली आहे त्यामुळे दारू व्यवसायिकांसह राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे.


राज वाईन्स च्या बेकायदा दारू तस्करीच्या गुन्ह्यात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आरोपी झाल्यावर जिल्ह्यात खळबळ उडाली होती त्या पार्श्वभूमीवर शहरातील काही गोदामे आणि देशी, विदेशी दारूची विक्री करणाऱ्या दुकानांची साठ्यासह उलाढालीची आणि आवश्यक रेकॉर्ड ची तपासणी करावी अशी मागणी करणारे निवेदन 25 एप्रिल रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे महानगर जिल्हाध्यक्ष स्वप्नील नेमाडे, महानगर सचिव अँड कुणाल पवार, राजु सोनार यांनी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांना दिले होते त्यांनतर ही कारवाई होत असल्याचे सांगण्यात येत आहे अशाच आशयाचे निवेदन राज्य उत्पादन शुल्क खात्याला 4 एप्रिल रोजी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनीही दिले होते
शहरातील चित्रा चौकात असलेल्या नीलम वाईन्सची या पथकाने तपासणी केल्यामुळे खळबळ उडाली आहे. हे दुकान एका मोठ्या राजकीय नेत्याचे असल्याने या धाडीबद्दल राजकारण्यांच्याही भुवया उंचावल्या आहेत
आज सकाळी चित्रा चौकात अचानक उत्पादन शुल्क भागाचे पथक पोहचले व त्यांनी नीलम वाईन्सची तपासणी करायला सुरुवात केली काही दुकानांची अचानक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने तपासणी सुरू केल्याने खळबळ उडाली आहे. यातील काही दुकाने बड्या नेत्याची असल्याने याच्या तपासणीत नेमके काय समोर येणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. लॉकडाऊनच्या काळात शहरातील वाईन्स शॉप मद्यसाठ्यात तफावत आढळल्यास कारवाई करावी, असेही निवेदनात म्हटले होते.
शहरातील एन. एन. वाईन , नीलम वाईन, या दुकानांवर तर सोनी ट्रेडर्स, विनोद वाईन, रामा ट्रेडर्स,आणि विजय सेल्स या होळसेलर्स गोडाऊन वर तपासणी सुरू झाली असल्याचे कळत आहे. आज शनिवारी सकाळ पासूनच स्टॉक मोजणीचे आणि तपासणी चे काम सुरू आहे. लॉक डाउन काळात दारूचा मोठा साठा विकला गेला असल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्या मुळे आणि तक्रार आल्या मुळे ही कारवाई होत असल्याची माहिती दहिवडे यांनी दिली. बंद च्या काळात होत असलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे लाखो रुपयांची दारू बंद च्या काळात विकली गेली असल्याची शंका व्यक्त केली जात आहे वास्तविक वाइन सेंटर मधून कोणतेही विक्री झाल्यावर सरकार दरबारी तात्काळ ऑनलाईन नोंद होत असते.