चाळीसगाव (प्रतिनिधी)- चाळीसगाव शहरातील भडगाव रोड परिसरातील सागर वाईन शॉपवर राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या पथकाच्या भरारी पथकाने आज छापा टाकुन पाच लाखांचा दारूचा अवैध साठा जप्त करून मालक शिवदास निंबा चौधरी यांना अटक करण्यात आली आहे.
सरकारी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त ए.एन.मोहोळ व जळगाव जिल्हा अधिक्षक एन.के.धार्मीक यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगावचे राज्य उत्पादक शुल्क निरीक्षक किरणसिंग पाटील व जळगावचे एस.के.कोल्हे यांनी ही धाडीची कारवाई केली. भडगाव रोडवरील सागर बीयर अॅन्ड वाईन शॉप (लायसन क्रमांक – 23) या दुकानाची तपासणी करून गुन्हा दाखल करण्यात आला. या दुकानाच्या शेजारच्या गाळा क्र.43 वरही धाड टाकून तेथे साठवलेले अनधिकृत देशी व विदेशी मद्य जप्त करण्यात आले. त्यानंतर दुकानाचे मालक शिवदास चौधरी यांच्या विरोधात गुरनं- 52/2020 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. एन.व्ही.ढगे, गोकुळ कंखरे, प्रविण वाघ, मुकेश पाटील, आर.डी.पाटील आदी या कारवाईत सहभागी होते.