अमळनेर (प्रतिनिधी) – अमळनेर शहरातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी न.प.ने सफाई कामगारांच्या सुरक्षिततेसासाठी माजी आ. साहेबराव पाटील यांचे मार्गदर्शनानुसार मुख्याधिकारी यांच्या निवासस्थानी गाऊन, मास्क, टोपी, सॅनेटायझेशन बॉटल, हात मौजे वाटप लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. पुष्पलता पाटील, माजी आ. कृषीभुषण साहेबराव पाटील, मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड, कामगार नेते रामभाऊ संदानशिव, संजय चौधरी आणि स्वच्छता निरीक्षक युवराज चव्हाण, संतोष बिर्हाडे यांचे हस्ते वाटप करण्यात आले.
अमळनेर न पा आरोग्य विभागाने यापूर्वी राष्ट्रीय पातळीवरील सर्वे नुसार सन्मान प्राप्त केला आहे. अमळनेर शहरात 67 बाधित असुन सुमारे 7 बाधिताचां मृत्यू झाला या परिस्थितीत युध्दपातळीवर न.पा.निधीतून खर्च केला जात असून, प्रशासनाकडुन अद्याप देखील अमळनेर न.प. ला निधी पुरवला जात नसल्याने मर्यादा येत आहे, शासनाने या कडे गंभीरपणे लक्ष देणे गरजेचे आहे.
आहे त्या निधीत सफाई कामगार यांची काळजी घेत असल्याने मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाडसह नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, कामगार नेते रामभाऊ संदानशीव यांचेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.









