जळगाव (प्रतिनिधी) – कामानिमित्त शहरात येताना भरधाव लक्झरी बसच्या चाकाखाली सापडून सेवा निवृत्त पोलीस नारायण देवराम पाटील (वय 60 , मूळ रा सामनेर) यांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी गोदावरी महाविद्यालयासमोर घडली. त्यांचा साथीदार गणेश भगवान पाटील (वय 22) गंभीर जखमी झाला आहे.
नारायण पाटील दोन वर्षांपूर्वी पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले पोलीस दलात त्यांनी प्रदीर्घ सेवा बजावली निवृतीनंतर दोन वर्षांपासून सामनेर या गावी पत्नीसह वास्तव्यास होते ते दुचाकी क्रमांक एम एच 19 बी बी 7777 या दुचाकीने आज शहरात येत होते. अपघातानंतर वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणीनंतर नारायण पाटील यांना मृत घोषित केले नारायण पाटील यांना दोन मुली विवाहित मुली आहेत. त्यांचा मुलगा मुबंई येथे कंपनीत कार्यरत आहे बंधू विठ्ठल पाटील े सामनेर येथे राहतात दुसरे बंधु किसन पाटील पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले आहेत.एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.








