जळगाव (प्रतिनिधी) – भाचीचा विवाह तरुणाशी ठरला होता. त्यानंतर मुलीच्या मामाने हा विवाह रद्द केला.त्यानंतर बुधवारी सायंकाळी तरुणांच्या घरी साथीदारीना सोबत नेऊन मामाने तरुणाशी त्याच्या भावाला बेदम मारहाण केल्याचा घटना खेडी बु येथे घडली. या प्रकरणी चार जणांच्या विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपक एकनाथ सोनवणे वय 22 हा तरुण खेडी बुद्रुक येथे भाऊ न्यानेश्वर ,वहिनी भारती यांच्यासह वास्तव्यास आहे.दीपक याचा विवाह नशिराबाद येथील छोटू हिरामण सोनवणे याची भाची सोबत ठरला होता. परंतु या लग्न संबधाला विरोध करत लग्न रद्द केले.
बुधवार दि 06 रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास दीपक हा घरासमोर पोलीस भरतीचा अभ्यास करत होता. त्यावेळी दीपक याचे नातेवाईक पप्पू रमेश पवार, सुलतान रमेश पवार दोन्ही रा. आसोदा , छोटू हिरामण सोनवणे, दीपक अर्जुन सोनवणे दोन्ही रा. नशिराबाद आले.दीपक याला काही न बोलता त्यानीं लथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीचा जाब विचारण्याचा दीपक याने प्रयत्न केला असता पप्पू पवार याने लोखंडी पाईप डोक्यात टाकून दीपक याला रक्तबंबाळ केले.दीपक याचा आवाज ऐकून त्याचा भाऊ न्यानेश्वर हा घराबाहेर आला. त्यालाही चौघानी लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. दोघी भावांना शिवीगाळ करून चौघानी पाहून घेऊ, अशी धमकी दिली.गल्लीतील जालीनंदर कारभारी महाजन यांनी या ठिकाणी धाव घेत हे भांडण सोडविले.याप्रकरणी दीपक याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कान्स्टेबल संजय भोई करत आहेत.








