नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – इस्लामाबाद, पाकिस्तानातील करोनाग्रस्तांच्या रुग्णांचा आकडा एक लाखाच्यावर गेला आहे. गेल्या 24 तासांत तेथे 4728 नवीन करोनाग्रस्त आढळल्याने तेथील एकूण रुग्णांची संख्या आता 1 लाख 3 हजार 671 इतकी झाली आहे. तेथे पंजाब प्रांतात करोनाबाधितांचा आकडा सर्वाधिक म्हणजे सुमारे 39 हजार इतका आहे.
त्या खालोखाल सिंध प्रांतात 38 हजार 108 रुग्ण आहेत. पाकिस्तान व्याप्त काश्मिरात सर्वात कमी म्हणजे 396 रुग्ण आहेत. करोनामुळे त्या देशात मरण पावलेल्यांची संख्या आता 2 हजार 67 इतकी झाली आहे. तेथील करोनाग्रस्त रुग्ण कमी होण्याचे प्रमाण सुमारे 34 टेक्क इतके आहे. त्या देशात चाचण्या घेण्याचे प्रमाणही तुलनेत कमी असून तेथे आत्तापर्यंत 7 लाख 5 हजार 833 चाचण्या घेण्यात आल्या आहेत.