अमळनेर (प्रतिनिधी) – अमळनेरात काल बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कची नूतन तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आली. रविवारी दि ७ जून रोजी शहरातील प्रबुद्ध विहारात वरिष्ठ कार्यकर्ते अशोक बिऱ्हाडे यांच्या अध्यक्षते खाली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशियल अंतर राखून राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कची तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आली.त्यात उपस्थितां मधून बहुमताने बौधाचार्य अशोक मोरे यांची तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तर संघटनेच्या कार्यध्यक्ष पदी प्रा सुनील वाघमारे, उपाध्यक्ष म्हणून योगीराज संदांनशीव,हर्षल सोनवणे, सचिन पदी सुनील करंदीकर सर, उपसचिव अजय भामरे, कोशाध्यक्ष पदी सेवानिवृत्त केंद्रप्रमुख विमलताई मैराळे व सदस्य म्हणून आनंद बिऱ्हाडे यांची निवड करण्यात आली. सदर निवडीचे समाज बांधवांकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते विजय गाढे, कमलाकर संदानंशीव, बौधाचार्य सिद्धार्थ सोनवणे, अरुण घोलप, धीरज ब्रम्हे, मिलिंद निकम , आदी कार्यकर्ते उपस्थित होते.